Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

25 April 2011

Thoughts on आदर्शवाद/Idealism

(कृपया लेखनशैली दुर्लक्षित करणे...Private blog/diary वरून लिखाण इथे आणण्याच्या खटाटोपाचा **"विचार"** प्रवर्तन-प्रसारण हा एकमेव उद्देश होता. डोकं फिरण्याचं (हे पोस्ट लिहिण्याचं) निमित्त झालं ते तथाकथित "टीम अण्णा" वर कांग्रेसने केलेले हेत्वारोप आणि "दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आणि स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही" ह्या म्हणीचा आलेला प्रत्यय! आता खरं-खोटं काही का असेना... पण लोकांची विचारसरणी मुळात किती हास्यास्पद बनवून ठेवली आहे शिक्षण आणि प्रसारमाध्यमांनी! त्या  निमित्ताने जाता जाता हे ही  सांगतो कि अण्णा टीमच्या बाजूने संपूर्णत: मी आहे असंही नाही आणि त्यांच्या रूपाने आपल्याला कोणी तारणहार मिळाला आहे अशा हास्यास्पद मताचा, भाबडा तर नाहीच नाही. मुद्दा आहे तो केवळ लोकांची विचारसरणी मुळात किती हास्यास्पद बनवून ठेवली आहे शिक्षण आणि प्रसारमाध्यमांनी ह्याचा आणि ह्याचाच !)

आदर्शवाद सत्यापासून कित्येक कोस दूर असतो. कमाईशिवाय प्रगती होऊ शकत नाही, हे सत्य आहे... कोणी सेल्फलेसली काम करणार नाही, आणि कोणी करेल तरी ते का??? पोटाची खळगी भरल्याशिवाय कोणाकडूनकाही होऊ शकतं का? "असामान्य" सज्जन माणूस, मग ती इमेज खोटी पण का असेना, लोकांना "खऱ्या सर्वसामान्य" सज्जन माणसापेक्षा जास्त भावते! कोणीही राजकारणी/धार्मिक बुवा "मी हे स्वत:चं करियर म्हणून करतो आहे, मात्र मी सोबत प्रामाणिकपणे देशस्थिती सुधरवायचा प्रयत्न करीन" असं सांगत नाही, ते या साठीच ! प्रत्येक जण "मी स्वत:ला समाजासाठी वाहून घेतलं आहे" हेच पटवायचा प्रयत्न करत असतो, जे की आपणही काहीसं सबकोन्शस्ली खरं मानून घेतो! चांगला राजकारणातला नेता हा आपल्याला आदर्शवादी का लागतो??? सत्तेतील "सर्व" लोकांनी स्वत:चं आयुष्य केवळ समाजासाठीच वेचावं ही अवास्तव, अवाजवी अपेक्षा आहे!

समाज असा आदर्शवादी नेता शोधात राहतो, कारण त्याला मुळात शिकवण चुकीची देण्यात आलेली असते. अशक्य अशा संकल्पनेत, स्वप्नात हा स्वार्थी समाज जगत राहतो. स्वार्थीपणा सर्व जीवांचा स्थायीभाव आहे, त्याची मोजदाद ती किती ह्यावर तो योग्य कि अयोग्य हे ठरवायला हवे. भ्रष्टाचारास समर्थन नाही, मात्र योग्य तो कामाचा मोबदला आमदार-खासदारांना देण्यात काय हरकत आहे? गांधीजींचा मोबदल्यास विरोध म्हणूनच पटत नाही, हे विचार मला इम्प्रक्टीकल वाटतात आता ! सत्य काय ते शाळांतून शिकवल्या जात नाही, आदर्शवादी गोष्टींत आपल्याला अडकवून ठेवले जाते, ते ह्याच भयाने की पिढी वाममार्गाला लागली तर काय?! माणूस खरं काय ते सर्व स्वत:च अनुभवातून शिकतो. ज्याला हे शिकायला वेळ लागतो तो संस्कार-वस्तुस्थिती द्वंद्व-संघर्ष या मनस्थितीत काही काळ तरी अडकून राहतो! माझी ती गत झाली होती काही काळ नक्कीच, हे ही त्या अनुषंगाने मी मान्य करतो! ;)

पहिल्यापासूनच शिक्षण वस्तुस्थितीशी जास्त जवळ आणले तर जास्त बरं होईल... प्रयोगाखातर चाणक्यनितीपासून सुरुवात करायला हरकत नाही.... आदर्शवाद विसरायला देखील शिकवायला हवा!

06 April 2011

Braj style composition

Here's what a friend of mine wrote, her first attempt at poetry in Braj dilect:

आप रंग में रंग दी मोहे.. पियरवा.. आप प्रीत में रंग दी!

तुम बिन कछु सोहत नाही..
पलकों में निंदिया आवत नाही..
जागते भी सपन तोरे..
सोते नैनन में चैन नाही..
आप प्रीत में रंग दी पियरवा.. मोहे रंग दी..

रंग तिहारे कितने सलोने..
तुम बिन जग में अंधियारे..
रोशन कर दे मन को मोरे..
एक बार मोहे रंग दे..
आप रंग में रंग दे पियरवा.. मोहे रंग दे..

बिसरी जग को..
सूदबुद भूली..
एक तू ही बस याद आवे..
रंग जाऊ में तोरे रंग में..
और कुछ ना मोरा मनवा चाहे..
आप रंग में रंग दी पियरवा..मोहे रंग दी..

-Rujuta Phadke
--------------------------------------------------
And here goes my attempt at composing the same, instrumental version for now, let me know what you think...


05 March 2011

काही मराठी गाण्यांचे विडंबन

(फार विचार करू नये, त्रास झाल्यास मंडळ जबाबदार नाही!)

"का कळेना कोणत्या क्षणी"
(चित्रपट: मुंबई-पुणे-मुंबई)

का कळेना कोणत्या क्षणी, आडवे आले असे
बदडूनी मला, सूज अन जखमा. गायब झाले कुठे
बंधू होते, ते प्रितीचे
काय उंच, साले ***** चे

एक मी पाच ते... लईच त्यांनी तोडले
किती विनवले.... तरी हाणले... नाही ऐकले!

एक तू एक ते... देवी तू दानव ते
साधासुधा.... मानव मी! नको हे नाते!

(का कळेना कोणत्या क्षणी.....)
-----------------------------------------------------
"धुंद होते शब्द सारे"
(चित्रपट: उत्तरायण)

मंद होते कॉलेज सारे
मंद होत्या शिक्षिका
एक मुलगी पटायची तर
आलीच तेव्हा परीक्षा
काय हे??? बुडुनी साऱ्या
ह्या अभ्यासात, KT मिळे आम्हाला तरी
कैसे सोडवू गणित हे ?

frustrate होऊनी, गाणी गाउनी,
वाचला त्याने syllabus अख्खा
चांद राती नाईट् मारुनी
टाकला चाप्टर ऑप्शन ला
का कळेना काय झाले
प्रश्न असे कि भे$%# पेपर कोरे
तिथेच गंडला हा असा
गपगार हा शांत हा

(मंद होते कॉलेज सारे
मंद होते पेपर सारे....)
---------------------------------------------------------------


(दोनही गाण्यांतील पहिल्या कडव्यातल्या स्त्री-पात्रांचा उल्लेख हा वस्तुस्थितीस धरून नाही, ह्याची देखील कृपया सभासदांनी नोंद घ्यावी)

20 February 2011

Uttarayan instrumental

My amateurish attempt at playing instrumental (with chords for a change )


(yeah, m looking at the keyboard cause m over-conscious coz of camera...)

27 January 2011

होसाना मराठी रूपांतरण :)हे हृदय, बंध ते... तुटूनही!
सा..SS द घालते, जळते अजूनही!
------------------
"पहा"...ट झाली आणि
"पाह"..ता तेव्हा तुला
मन असे बावरले!
गोंधळले, वेंधळले
सारवले, सावरले
तरी भरकटतहरवले!

होसाना, मर्यादा ओलांडल्या जिथे,
होसाना, माझ्या आता हाती कुठे?
मी हरलो
..की जिंकलो
त्याचा तरी आता इथे पत्ता कुठे?

होसाना, जगणे ते कळले मला
होसाना, घाबरणे आता कोणा?
होसाना, अपवाद तो तुझ्या मना
होसाना....
-----------------------------------------
(Rap) Everybody wanna know what I feel like? I feel like
I really wanna be here with you
Its not enough to say that we are made for each other
Its love that is hosanna true
Hosanna, be there when you're calling out my name
Hosanna, meaning of my whole life has changed
I never wanna be the same.. its time we re-arrange
I take a step... you take a step...
Me ah... calling out to you
hello helllo hello yo o hosanna
-----------------------------------------
जग सारे भवताली
रुपेरी रुपेरी
सौंदर्य ते कोठून आले?
तुझ्या नजरेने
कधी ते मोहरले असावे,
की स्पर्शाने थरारले?

होसाना, स्पष्टीकरण दुसरे ते काय?
होसाना, प्रश्नाचे उत्तर या काय?
तुझ्याच त्या प्रेमात,
अन त्या नादात
तेही वेडे, जग वेडं
लोक वेडे, आम्हीही वेडे!

होसाना, व्यक्त करायला मला
होसाना, शब्द का ते सुचेनात!
होसाना, शब्दांनाही आहे सीमा....
होसाना....
-----------------------------------------
(हे हृदय, बंध ते... तुटूनही! सा..SS द घालते, जळते अजूनही!)

Waiting for your comments :)

23 January 2011

Video background score (my very first)

A few months back, wife of a friend of mine was supposed to present a video to her professor and audience as part of her project. Their project was about a software that alerts you whenever a synced blue-tooth compatible device gets out of its range (say you happen to forget your headset). I was asked if I could spare some time making background score and I was shown the video she made.

Here's what I came up with. Single layer, simple tunes! Since video was of animation genre, I came up with something that would rather suite a video-game, but (hopefully) adhering to the emotions/mood it had to convey along the way. :)Thanks for your time :)