Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

30 March 2008

लहरी short quotes! (Part2)

Disabilities are physiological, inabilities are rather psychological. Former ones are laid down by the nature, later ones are by the man himself. Irrespective of the end result, (i.e. whether one succeeds in overcoming those or not,) its a man who triumphs and NOT the nature!
---------------------
The Truth is the infinite space, facts are mere dimensions... perspective is something that confines the whole scenario and distances get relative!
---------------------
मला एक कळत नाही, लोकं "परत परत", "तीच तीच" गोष्ट "सारखी सारखी" "repeat" का करतात??? :D

-Vedhas Pandit

(I guess first one is not as obvious I thought as it would be, so this deserves a little explanation... What I meant was if a man succeeds in overcoming disabilities/inabilities there is no doubt who the winner. If he doesn't, it only means that he is restricted by himself and NOT by the nature, for the simple reason that he does have that potential to cross that so-called barrier!!! So its again a man who's "feelings", whether he can do something or not, rule!)

19 March 2008

Journey so far.....

I have gone through following phases, as far as my "beliefs" are concerned.

In chronological order:

1: Theist:Hinduism

Hinduism, because of Gods and Goddesses from Hindu Mythology! I was taught Ramaraksha, Ganapati Stotra and many other shlokas. Like everyone else, I honestly believed in Mahabharata, Ramayana, Puranas, whatever I was told at that age.

2: Theist:No "ism" here!!!

I came to know about other religions and learnt that all the Gods are basically the same! Btw, remotely relevant is an excerpt from "An Autobiography" by Pt. Jawaharlal Nehru

3: Atheist

Logic and scientific studies demand proofs and logical derivations. But how can you prove existence of God? And even if divine power was to exist, if its beyond scope of our control, whats the point in following rituals? राग यायचा विशेषतः "पाप करे और गंगा नहाए" टाइप लोकांचा, धर्मवारून भांडणार्यांचा आणि बुवा लोकांचा.... हा असा राग तर अजूनही येतो!

4. Atheist:Hinduism

Personal experiences/ experiments/ reading/ discussions regarding Hinduism/sacred texts made me realize that I was being a blind atheist. I also learnt that atheism does have a place in Hinduism and also that most of the rituals do make sense!

5. Agnostic:Hinduism

If logical reasoning/ experiences stand for most of their(believer's) claims, I cannot possibly refute their remaining claims that I do not truly agree on as of today! There are possibilities: I might not have reached the required level of maturity, my senses might not be developed to an extent where I can grasp essence of their science(?). Better way: सरळ सांगणं "मला माहीत नाही!" :)

6. What Next???

The most appealing is the Hindu philosophy.
But the question remains unanswered... What is Next???


That..... even I do not know! Don't worry, I will keep you updated!!! :)

16 March 2008

अलविदा

खूप एकटं-एकटं, एकाकी वाटलं की मी सरळ होस्टेलची गच्ची गाठतो... (आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर असं काहीसंे नेहमी रात्रीच होतं. ;)) उंच buildings, झाडांची डोकी, वीजेच्या तारा ह्यातनं ते तुकडे तुकडे पडलेलं आकाश पाहून मी अधिकच खिन्न होतो . मग मी तिथल्या माझ्या आवडत्या जागेवर जातो आणि इथून आकाश छान दिसतंय म्हणून थोड़ासा खुशही होतो. एव्हाना मनातली चीडचीडपण कमी झालेली असते...

असं ऐकलय की अशावेळी लोक झाडांशी, फळाफुलांशी, तार्यांशी गप्पा मारत बसतात. मी नाही उगीच बोलायला जात असलं काही! बोलणार तरी काय? विषयच नसतो तसा! मी त्यातल्या त्यात सगळयात तेजस्वी तार्याला पकडतो आणि पाहत राहतो त्याच्याकडे उगीच एकटक...

त्या काळ्याकभिन्न आकाशात आजुबाजुचे तारे मग हळूहळू स्वतःचं अस्तित्व दाखवायला लागतात. माझं एकटेपण अजूनच गहिरं करतात. निव्वळ दुष्टपणा असतो हा! पण गंमत अशी की माझ्यानकळत मीही त्या एकटेपणाचं (आणि मग पर्यायाने स्वतःचंच :) ) कौतुक करू लागतो.

हे तारेही तसलेच! प्रत्येकजण स्वतःच्याच कक्षेत फिरणार. ते एकमेकांच्या जवळ येतील, दूरही जातील... पण सर्व विधीनियमांप्रमाणे, सगळं अगदी ठरल्यासारखं! काही काही असताताही धुमकेतू, उल्का.... अवचित उगवतात हे गडी! पण अशांकडे पाहत हे तारे आपल्यासारखे उगीच त्रस्त होत नसतील. आणि एवढं असूनही काही लोक उल्का पडताना पाहून मनात बावळटसारख्या इच्छा धरतात. श्रद्धा म्हणावी त्या बापड्यांची... जाऊ दया!

....असे काहीही random विचार सुरु होतात. कित्येक वेळ मी तसाच उभा असतो. थोड्या वेळाने मला आकाश उगीचच त्रासलेलं वाटतं. ते खरं तर कंटाळलेलं असतं. त्याच्याअंगाखांद्यावर खेळत असतात ही सारी पिल्लं, पण त्याला सवंगडी आहे??? त्याच्याकड़े कोणतं त्याचं पिल्लू बघतंय??? काहीही झालं तरी तो कुठल्या आकाशाकडे पाहणार??

....तसे आम्ही दोघे समदुःखीच! त्याचं दुःख मात्र त्याच्यासारखंच अफाट!
... पण तरी आमची दोस्ती होत नाही.






मी त्याला साधं अलविदासुद्धा म्हणत नाही.

05 March 2008

इतरांचे ब्लॉग्स वाचताना !

सध्या मी अनोळखीलोकांचे ब्लॉग्स वाचायला लागलोय....

आजकाल असे ब्लोग्स वाचतो आणि वाचता वाचता वाटतं.... की अरे, हे तर मलाही कधीपासून म्हाणाय्चंहोतं.... वाटतं,हा/ही आणि मी किती same आहोत!!! कोण आहे हा? कोण आहे ही? काय आपलं नातं त्यांच्याशी? असेल का काही खरंच नातं ???आणि असं करत करत हे complete strangers उगीचंच (???!!!!) आपलेसे वाटुलागतात!
उदाहराणादाखल आता हे वाचा:
"आपण जीवाच्या आकांताने एखादि गोश्ट ओरडून सांगताना देखिल समोर्च्या माणासाच्या चेह्र्यवरचि रेघ सुद्धा हलंत नाहि तेव्हा गरज असते ती लेखणी आणि वहिची, थोडक्यात लिहायची ! "(दीपिका)

जेव्हां काही सांगायच असेल बोलायच असेल तर कोणितरी येकणार असाव लागत नाही। माझ येकणार असं कोणी नाही। पण मला खुप बोलावस वाट्त मग हल्ली हल्ली मी मनातल्या मनात बडबड करायला लागलोय. तिच बडबड तुमच्या समोर मांड्तोय ह्या ब्लॊगवर. (प्रशांत ठाकुर)

उद्योगी आहे म्हणा हव तर... पण सद्या सगळे उद्योग बंद आहेत म्हणुन नुसतीच खळबल माजली आहे... होत अस कधीतरी ;)... असो इतकच सांगता येईल सद्या की चालु आहे शोध ॥ शोध स्वतःचाच....(स्नेहा)

आपल्याला हे जे काही वाटतंय, ते म्हणजे विश्वाच्या पसाऱ्यात आपल्या निरर्थकतेचा आणि क्षणभंगुरतेचा झालेला साक्षात्कार आहे, असं काहीसं गोड त्याला वाटायला लागलं होतं. म्हणजे बुद्धाला बोधिवॄक्षाखाली जे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ते साधारण ह्याच जातकुळीतलं असावं असंही गोड वाटून गेलं. पण उगाच चाळा म्हणून हातातलं काम सोडून याबद्दल शोधताना आपल्याला हे जे वाटतंय तो एक आजार आहे; असलं सांगणाऱ्या विकीची त्याला तिडीक आली। (सर्किट)

वाटलं ना, मला वाटलं तसंच??? जणू आपल्या मनातले "कधीचे" विचार कोणीतरी "चोरतंय"? पण चोर म्हणताय ते चुकीचंय बरं का! अहो, वाटायला काय लागतं? वाटतं तर आपल्या सगळ्यांनाच.... शेवटी माणसंच आपण! थोडी बेरीज, वजाबाकी करत इकडून-तिकडून सगळे सारखेच... पण हे काही लोक लिहिताताच ना इतकं भारी! आपण उगीच "आपल्यालासुद्धा असं काहीसं सुचलं होता बरं का!", म्हणत समाधान वाटून घ्यायचं! :)
सौ. अनुराधा सचिन म्हापणकरांच्या पाणी-पुरीचा शेवट मला फारच भावला!!! जास्वन्दीचा ब्लॉग बर्यापैकी girlish आहे, पण त्यामुळे वाचताना वाटतं, जणू आपण छोटे KG मधले आहोत आणि कोणीतरी आपल्याला छान चिऊकाऊच्या गोष्टी सांगतेय! तिने स्वतःच्या बहिणीबद्दल लिहीलेला postसुद्धाpersonalized वाटला नाही, मला चक्क माझ्या भावांची, मी लहान असतांना घातलेल्या दंग्यांची आठवण झाली... वाटलं मी शेंडेफळ असल्याने विराज-अनीशलाही असंच वाटलं असेल का सुरवातीला?! अजूनही बरंच काही वाटलं, त्यांची आठवणही आली! असो... ंजास्वंदीचं "My dream house" तर वाचाच! त्या postचं श्रेय जसा त्या छोट्या पिल्लांचं आहे, तसं ते काहीसं त्या तेजस्विनीचंदेखील आहे... खरंच सांगतो मला नसतं मांड़ता आलं ते एवढ्या "गोड गोड" भाषेत! (माझ्या इतर posts वरून कळलं असेलच तुम्हाला ते!) "सहज सुचलं म्हणून" सारखे ब्लोग्स वाचताना तर...... आता काय बोलू! सालंSpeechlessच वायला होतं!!! कसली हुशार असतातलोकं, किती काय काय लिहू शकतात, आणि तेहि कितीसुंदर पद्धतीनं!

आताहे सर्व लिहीत असतांना एक अजुन ब्लॉग आठवंला... (त्याबद्दल बोलिनाच नंतर!) तर तो शोधता शोधता बघा इथे पोहोचलो! हा अजुन एकावेगळ्या कलेचा नमुना...

कधी असं नवं शिकायलाही मिळतं:
"ह्या आधीच्या वाक्यात लिहायला अजून बरंच काही एकाचवेळी सुचत होतं, पण ते लिहायच्या नादात सारा अर्थ ढासळेल, कुठे कशी विरामचिन्हे घालावीत यात गफ़लत होईल, आणि उगाच गद्याचं पद्य होईल म्हणून पुढील उपवाक्ये वेगळी लिहीत आहे" मी ब्लॉग लिहिताना similarly confuse होतो खरा, पण मग ही idea बरीय!

अर्थात सगळेच पाहिलेले ब्लॉग आवडले असं नक्कीच नाही.... जे आवडले, तेच इथे मांडले...

नाहीतर "लोकं काय आजकाल कशाचंही कौतुक करतात!"!!! :P

04 March 2008

प्रेमात पडणं म्हणजे.....

प्रेमात पडणं म्हणजे..... हुरहुर ही आलीच
हुरहुर आहे म्हणजे उत्सुकताही..

उत्सुकता...

म्हणजे नक्कीच असतात काही अपेक्षा,,,
अपेक्षा आहेत तर ... अपेक्षाभंग हा तर ठरलेलाच!
म्हणजे आता परत एक वेडा स्वतःत गुरफटणार...

खरंच...!
तो वेडाच!!!!
स्वतःलाच स्वतःची कोडी घालतो तो!
सुटता सुटत नाहीत, पण तरी सोडवत बसतो....
का निव्वळ नाटक करतो?
तोच जाणे....!

मग थोड्यावेळाने स्वतःशीच हसतो!
म्हणतो "हे काय खरडलं मी? कोणाला पाहून वाटेल की मी खरंच प्रेमात पडलोय..."
परत हसतो तो!

हसतो खरा... पण ह्या वेळी काहीसा वेगळा! आत्ममग्न!
दारापाशी चाहुल लागते तसा तो भानावर येतो आणि त्याच्या नकळतंच वहीची पानं पलटवतो!
"काही लीहीत होतास?"
"छे रे! काही काय!! syllabus चाळत होतो इतकंच!"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.....आणि ही सुद्धा link तुटते ती कायमचीच!!! (हो, "सुद्धा"!)


ते पान आता त्याच्यासाठी अनोळखी असतं...
ना त्याला आता स्वतःचं ते कोडं आठवंत,
ना स्वतःच्याच ओळींचा अर्थ लागत....

ते पान तिथे बिचारं अर्थाशिवाय पोरकं झालंय...
नुसतं शब्दबंबाळ! बाकी काही नाही !
पण त्या पानाची ना काही तक्रार, ना त्याला कसला राग!
निमुटपणे वहीत दडी मारतं ते! पोटात कोणालाच न कळलेली गुपितं दडवून...!