Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

25 June 2010

स्वल्पविराम

स्वल्पविराम

ठेउन ओळ गेली माझ्या वहीत ती
झाला उशीर थोडा वाचायला मला ||
उशीराच पाहीला तो पानाचा दुमडलेला कोपरा
अजुनही त्या पानाला मात्र, मोगरयाचा गंध होता ||
अंधुक होती काही अक्षरे, शाई पुसटशी होती
इथेच बहुदा तिच्या डोळ्यातला, मोती ओघळला होता ||
वाटले मिळाली सर्व उत्तरे, क्षणाचा होता भ्रम तोही
कारण प्रत्येक उत्तरामागे, एक नवा प्रश्न होता ||
वाट वेगळी झाली तरीही कुठेतरी भेटू आपण
दुनिया गोल आहे, इतकातरी शास्त्रावर विश्वास होता ||
शेवटी पुन्हा तेच सारं, अखंड प्रवास असीम शांतता
कधी न संपणार्या कवितेचा, हा फक्त स्वल्पविराम होता ||
-हृषिकेश गांधी

झाली असेलही तशी हळवी ती,
मोहरून गेलो
अन् मी उगाच, दोष मात्र तिचा नव्हता ||
ती मला की मी स्वत:ला,
कोण झुलवतंय कोणाला, हाच खरा प्रश्न होता
||
प्रश्नाचिन्हांवर "पूर्णविराम" तिचे,
स्वल्पविरामात जगण्याचा माझाच हट्ट होता
||
-वेधस पंडित