महा pathetically वाईट दिवस होता आजचा... म्हणजे हे आत्ता काहीसं थोड्या वेळापासनं वाटायला लागलं आहे. सकाळी गेलो project certificate घ्यायला तर ते काम ह्या ना त्या कारणाने झालं नाही... (कारणही तसं म्हणायला शुल्लकच, basically bureaucracy!). नंतर जेवण करून (आणि नंतरची डुलकी घेण्याची इच्छा झटकून :( ) चेम्बूरला reportची order दिलेली परत घ्यायला गेलो, तर golden embossing ची qualityच सुमार निघाली. त्यातत्या हुशार माणसाने "D. report binding Tech." degree बहाल केली मला. B-> D प्रिंटिंग चुकेमुळे माझं २ ट्रेन्स change करून गेलेलं जाणं वाया ठरलं. ( म्हणजे आता उदया परत जाणं आलं!) दरम्यान शिवाजी पार्क ला राउंड मारायला एका मैत्रिणीला (:D) अणि नंतर दुसऱ्या मित्राला फ़ोन केला तर दोघेही आजच नेमके busy! मग आत्ता ऑनलाइन आलोय तर त्या certificate साठीची फोर्मलिटी पूर्ण करायला जो सरांना ईमेल टाकला, त्यावर त्यांचा काहीसा negative reply आलाय, तो reply दत्त म्हणून inboxमधे हजर! म्हणजे certificate मिळेल पण उशिरा मिळणार असं दिसतंय.... एवढा वेळ डोकं फिरलं नव्हतं, पण आत्ता वाटतंय 'छ्या यार, आज का दिन ही ख़राब था!!!'
त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढी की आज शाळेतल्या दोस्तांशी बर्याच वेळ गप्पा झाल्या ... तसं तास-२तास बोलणं विशेष नाहीय्ये माझ्यासाठी, पण दिवस वाईट गेल्यानंतरचे फ़ोन काहीसे वेगळे ठरतात. मूड फ्रेश होउन जातो एकदम! :)
4 comments:
Its ok re.... hota hai , chalta hai , duniya hai :)
friends shi gappa zalya na mag kay lai besht and zakkkas :P
अहो राजे , हे बरोबर नाही! त्या पूर्ण लेखाचं काय झालं ? हे असं मोजकंच का लिहिलं आहेस ?
तो लेख चांगला आहे ! पूर्ण कर आणि post कर!
hmm... तो अजुन लिहून पूर्ण झाला नाहीय्ये! (आणि खरं सांगायचं तर नंतर तो पूर्ण करायला बसलोसुद्धा नाही, परत माहित नाही US मधे तो कागद मी आणला आहे की नाही ते! :(( )
राजे, तुमच्या ब्लॉगच्या उदघाटन समारंभाचे काय??? गणेशोत्सवाच्या शुभ मुहुर्तावर होउन जाऊ द्यात एकदा!
Post a Comment