(कृपया लेखनशैली दुर्लक्षित करणे...Private blog/diary वरून लिखाण इथे आणण्याच्या खटाटोपाचा **"विचार"** प्रवर्तन-प्रसारण हा एकमेव उद्देश होता. डोकं फिरण्याचं (हे पोस्ट लिहिण्याचं) निमित्त झालं ते तथाकथित "टीम अण्णा" वर कांग्रेसने केलेले हेत्वारोप आणि "दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आणि स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही" ह्या म्हणीचा आलेला प्रत्यय! आता खरं-खोटं काही का असेना... पण लोकांची विचारसरणी मुळात किती हास्यास्पद बनवून ठेवली आहे शिक्षण आणि प्रसारमाध्यमांनी! त्या निमित्ताने जाता जाता हे ही सांगतो कि अण्णा टीमच्या बाजूने संपूर्णत: मी आहे असंही नाही आणि त्यांच्या रूपाने आपल्याला कोणी तारणहार मिळाला आहे अशा हास्यास्पद मताचा, भाबडा तर नाहीच नाही. मुद्दा आहे तो केवळ लोकांची विचारसरणी मुळात किती हास्यास्पद बनवून ठेवली आहे शिक्षण आणि प्रसारमाध्यमांनी ह्याचा आणि ह्याचाच !)
आदर्शवाद सत्यापासून कित्येक कोस दूर असतो. कमाईशिवाय प्रगती होऊ शकत नाही, हे सत्य आहे... कोणी सेल्फलेसली काम करणार नाही, आणि कोणी करेल तरी ते का??? पोटाची खळगी भरल्याशिवाय कोणाकडूनकाही होऊ शकतं का? "असामान्य" सज्जन माणूस, मग ती इमेज खोटी पण का असेना, लोकांना "खऱ्या सर्वसामान्य" सज्जन माणसापेक्षा जास्त भावते! कोणीही राजकारणी/धार्मिक बुवा "मी हे स्वत:चं करियर म्हणून करतो आहे, मात्र मी सोबत प्रामाणिकपणे देशस्थिती सुधरवायचा प्रयत्न करीन" असं सांगत नाही, ते या साठीच ! प्रत्येक जण "मी स्वत:ला समाजासाठी वाहून घेतलं आहे" हेच पटवायचा प्रयत्न करत असतो, जे की आपणही काहीसं सबकोन्शस्ली खरं मानून घेतो! चांगला राजकारणातला नेता हा आपल्याला आदर्शवादी का लागतो??? सत्तेतील "सर्व" लोकांनी स्वत:चं आयुष्य केवळ समाजासाठीच वेचावं ही अवास्तव, अवाजवी अपेक्षा आहे!
समाज असा आदर्शवादी नेता शोधात राहतो, कारण त्याला मुळात शिकवण चुकीची देण्यात आलेली असते. अशक्य अशा संकल्पनेत, स्वप्नात हा स्वार्थी समाज जगत राहतो. स्वार्थीपणा सर्व जीवांचा स्थायीभाव आहे, त्याची मोजदाद ती किती ह्यावर तो योग्य कि अयोग्य हे ठरवायला हवे. भ्रष्टाचारास समर्थन नाही, मात्र योग्य तो कामाचा मोबदला आमदार-खासदारांना देण्यात काय हरकत आहे? गांधीजींचा मोबदल्यास विरोध म्हणूनच पटत नाही, हे विचार मला इम्प्रक्टीकल वाटतात आता ! सत्य काय ते शाळांतून शिकवल्या जात नाही, आदर्शवादी गोष्टींत आपल्याला अडकवून ठेवले जाते, ते ह्याच भयाने की पिढी वाममार्गाला लागली तर काय?! माणूस खरं काय ते सर्व स्वत:च अनुभवातून शिकतो. ज्याला हे शिकायला वेळ लागतो तो संस्कार-वस्तुस्थिती द्वंद्व-संघर्ष या मनस्थितीत काही काळ तरी अडकून राहतो! माझी ती गत झाली होती काही काळ नक्कीच, हे ही त्या अनुषंगाने मी मान्य करतो! ;)
पहिल्यापासूनच शिक्षण वस्तुस्थितीशी जास्त जवळ आणले तर जास्त बरं होईल... प्रयोगाखातर चाणक्यनितीपासून सुरुवात करायला हरकत नाही.... आदर्शवाद विसरायला देखील शिकवायला हवा!