Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

05 March 2011

काही मराठी गाण्यांचे विडंबन

(फार विचार करू नये, त्रास झाल्यास मंडळ जबाबदार नाही!)

"का कळेना कोणत्या क्षणी"
(चित्रपट: मुंबई-पुणे-मुंबई)

का कळेना कोणत्या क्षणी, आडवे आले असे
बदडूनी मला, सूज अन जखमा. गायब झाले कुठे
बंधू होते, ते प्रितीचे
काय उंच, साले ***** चे

एक मी पाच ते... लईच त्यांनी तोडले
किती विनवले.... तरी हाणले... नाही ऐकले!

एक तू एक ते... देवी तू दानव ते
साधासुधा.... मानव मी! नको हे नाते!

(का कळेना कोणत्या क्षणी.....)
-----------------------------------------------------
"धुंद होते शब्द सारे"
(चित्रपट: उत्तरायण)

मंद होते कॉलेज सारे
मंद होत्या शिक्षिका
एक मुलगी पटायची तर
आलीच तेव्हा परीक्षा
काय हे??? बुडुनी साऱ्या
ह्या अभ्यासात, KT मिळे आम्हाला तरी
कैसे सोडवू गणित हे ?

frustrate होऊनी, गाणी गाउनी,
वाचला त्याने syllabus अख्खा
चांद राती नाईट् मारुनी
टाकला चाप्टर ऑप्शन ला
का कळेना काय झाले
प्रश्न असे कि भे$%# पेपर कोरे
तिथेच गंडला हा असा
गपगार हा शांत हा

(मंद होते कॉलेज सारे
मंद होते पेपर सारे....)
---------------------------------------------------------------


(दोनही गाण्यांतील पहिल्या कडव्यातल्या स्त्री-पात्रांचा उल्लेख हा वस्तुस्थितीस धरून नाही, ह्याची देखील कृपया सभासदांनी नोंद घ्यावी)

7 comments:

AJ said...

hahahaaahaahaa! sahi ahe! when it is sung in the tune... maja yete jaam ! good work!!!

Manjish said...

Hahaha manasa.. Awar swatahala

विक्रम वालावलकर. said...

जमलंय बुआ!
लगे रहो..

Makarand MK said...

("सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?" च्या चालीवर ...)

"क्षणी धुंद" झाल्या भावना
ऐशी मधुर तव ही रचना

कविता अशी ती देखणी, प्रेमार्तता सांगे खरी...
ती प्रीत हास्ये बदलसी, उरी हास्य ते मावेच ना !

जे जे विडंबनी लागते, ते सर्व आहे ओतले
"चाली"स ना परी छेदते, काव्याप्रती "मधु"वंदना!

("क्षणी धुंद"= 'का कळेना कोणत्या "क्षणी"' आणि '"धुंद" होते' मधील शब्द घेतले आहेत; मधु = मकरंद)

sahdeV said...

Thanks Apurva, Manjish and Bhai!

Mak, I am humbled by your comment! Both -figuratively by the praise, and literally by the standards of your विडंबन! Thanks! :)

शतानंद said...

हे आणि हे! असंच आणखीन येऊ देत..
नसतेस घरी तु जेव्हा
मी आडवा तिडवा होतो
असं मी मागे करत होतो.. पण पुढे ते जामच अश्लील झालं म्हणून विचार सोडून दिला!

शंतनु said...

hahahaha.. best! Kavita pan ani varchi charcha suddha!!

(hi comment lihitana mala ti jahiraat athavli - "amhala pasanta ahe. kon? tumchi mulgi.. ani mahabhrungaraj telahi!")