(फार विचार करू नये, त्रास झाल्यास मंडळ जबाबदार नाही!)
"का कळेना कोणत्या क्षणी"
(चित्रपट: मुंबई-पुणे-मुंबई)
का कळेना कोणत्या क्षणी, आडवे आले असे
बदडूनी मला, सूज अन जखमा. गायब झाले कुठे
बंधू होते, ते प्रितीचे
काय उंच, साले ***** चे
एक मी पाच ते... लईच त्यांनी तोडले
किती विनवले.... तरी हाणले... नाही ऐकले!
एक तू एक ते... देवी तू दानव ते
साधासुधा.... मानव मी! नको हे नाते!
(का कळेना कोणत्या क्षणी.....)
-----------------------------------------------------
"धुंद होते शब्द सारे"
(चित्रपट: उत्तरायण)
मंद होते कॉलेज सारे
मंद होत्या शिक्षिका
एक मुलगी पटायची तर
आलीच तेव्हा परीक्षा
काय हे??? बुडुनी साऱ्या
ह्या अभ्यासात, KT मिळे आम्हाला तरी
कैसे सोडवू गणित हे ?
frustrate होऊनी, गाणी गाउनी,
वाचला त्याने syllabus अख्खा
चांद राती नाईट् मारुनी
टाकला चाप्टर ऑप्शन ला
का कळेना काय झाले
प्रश्न असे कि भे$%# पेपर कोरे
तिथेच गंडला हा असा
गपगार हा शांत हा
(मंद होते कॉलेज सारे
मंद होते पेपर सारे....)
---------------------------------------------------------------
(दोनही गाण्यांतील पहिल्या कडव्यातल्या स्त्री-पात्रांचा उल्लेख हा वस्तुस्थितीस धरून नाही, ह्याची देखील कृपया सभासदांनी नोंद घ्यावी)