खूप एकटं-एकटं, एकाकी वाटलं की मी सरळ होस्टेलची गच्ची गाठतो... (आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर असं काहीसंे नेहमी रात्रीच होतं. ;)) उंच buildings, झाडांची डोकी, वीजेच्या तारा ह्यातनं ते तुकडे तुकडे पडलेलं आकाश पाहून मी अधिकच खिन्न होतो . मग मी तिथल्या माझ्या आवडत्या जागेवर जातो आणि इथून आकाश छान दिसतंय म्हणून थोड़ासा खुशही होतो. एव्हाना मनातली चीडचीडपण कमी झालेली असते...
असं ऐकलय की अशावेळी लोक झाडांशी, फळाफुलांशी, तार्यांशी गप्पा मारत बसतात. मी नाही उगीच बोलायला जात असलं काही! बोलणार तरी काय? विषयच नसतो तसा! मी त्यातल्या त्यात सगळयात तेजस्वी तार्याला पकडतो आणि पाहत राहतो त्याच्याकडे उगीच एकटक...
त्या काळ्याकभिन्न आकाशात आजुबाजुचे तारे मग हळूहळू स्वतःचं अस्तित्व दाखवायला लागतात. माझं एकटेपण अजूनच गहिरं करतात. निव्वळ दुष्टपणा असतो हा! पण गंमत अशी की माझ्यानकळत मीही त्या एकटेपणाचं (आणि मग पर्यायाने स्वतःचंच :) ) कौतुक करू लागतो.
हे तारेही तसलेच! प्रत्येकजण स्वतःच्याच कक्षेत फिरणार. ते एकमेकांच्या जवळ येतील, दूरही जातील... पण सर्व विधीनियमांप्रमाणे, सगळं अगदी ठरल्यासारखं! काही काही असताताही धुमकेतू, उल्का.... अवचित उगवतात हे गडी! पण अशांकडे पाहत हे तारे आपल्यासारखे उगीच त्रस्त होत नसतील. आणि एवढं असूनही काही लोक उल्का पडताना पाहून मनात बावळटसारख्या इच्छा धरतात. श्रद्धा म्हणावी त्या बापड्यांची... जाऊ दया!
....असे काहीही random विचार सुरु होतात. कित्येक वेळ मी तसाच उभा असतो. थोड्या वेळाने मला आकाश उगीचच त्रासलेलं वाटतं. ते खरं तर कंटाळलेलं असतं. त्याच्याअंगाखांद्यावर खेळत असतात ही सारी पिल्लं, पण त्याला सवंगडी आहे??? त्याच्याकड़े कोणतं त्याचं पिल्लू बघतंय??? काहीही झालं तरी तो कुठल्या आकाशाकडे पाहणार??
....तसे आम्ही दोघे समदुःखीच! त्याचं दुःख मात्र त्याच्यासारखंच अफाट!
... पण तरी आमची दोस्ती होत नाही.
मी त्याला साधं अलविदासुद्धा म्हणत नाही.

1 comment:
thodasa relevant post.. pan barach vegala :)
pan sahiye!! as i said maze beliefs bavalat asu shaktat.. pan mi suddha tuTaNaarya taaryakade kahitari magate...
te kharach asel tar apan chance ka sodaycha rav?
Post a Comment