Hey, thanks for stopping by!!! Reader No.:

08 May 2008

Dedicated to all my coepian friends!

Its way inappropriate time to write something like this, I mean... to spend time on something so foolish, so sentimental stuff, especially when my project viva is scheduled tomorrow and there's almost infinite amount of workload! But I just can't resist myself now, since the theme of this post has been lingering in my mind since quite a few days. Departmental farewell is just over and this is just another sort of hangover! The reality strikes you and it says "its time to part ways dude!" and then you suddenly realize futility of all those petty fights, mean internal politics people were busy with, undesired yet inevitable groupism in class etc. You feel like giving goodbye hug to almost every batch-mate, including those you had trouble getting along with,or even those with whom you have barely exchanged a word all these years. If that's the case with strangers(???), how can I possibly resist myself from writing all this when it boils down to saying goodbye to my beloved friends. Unfortunately, I can't really express myself nonverbally when I get sentimental, I prefer to crack jokes (read PJs :D), smile or simply walk away... (Quite a weak point for someone, who can strongly express his anger, happiness or excitement!) Oops, did I get carried away from the main topic? Oh yes, it was all about my COEPian friends!

I start with केतन -उर्फ़ केतू -उर्फ़ केत्या आणि अजय -उर्फ़ अज्या -उर्फ़ भज्या -उर्फ़ बैल... (आणि अजुन बरंच कही). हे दोघे नसते तर माझ्या assignments आणि journals वेळेवर submit होणं निव्वळ अशक्य होतं. शेवटच्या क्षणी शिव्या घालत, झापत, पण प्रत्येक सेमेस्टर ला एकातरी विष्यासाठी graphs काढून देणं, diagrams काढून देणं किंवा साधं फाइल लावून देणं ह्यातलं काहीना काही हे करत आले! आम्ही तिघांनी (ज्याला आम्ही 37,38,39 ग्रुप म्हणतो), मिळून 2nd-3rd year ला केलेली धमाल अजूनही डोळ्यांसमोर जशिच्या तशी उभी रहते. मजा यायची तेव्हा! केतू तर सगळ्या सरांची आणि madamची धमाल नक्कल करायचा! खुशलानी madam चं 'CRO ख़राब है" वाकय केत्याकडणंच ऐका राव! अजयबाबतची मला भावणारी... सगळ्यात जास्त भावणारी बाब म्हणजे मी आजवर पाहिलेला हा एकुलता एक इसम आहे जो अतिशय स्पष्टवेत्ता, किंवा किमान जे काही वाटतं ते खरं, समोरच्या मताप्रमाणे आपलं मत न बदलता मांडणार्यतला आहे-- मात्र सगळ्यांशी त्याचे relations देखील चांगले आहेत. विचार केलं तर हे combination rare आहे. माणसाचं अस्तित्व, वर्तन, अध्यात्म आणि तद्वत संकल्पना इ. बाबत आमच्या तासन तास चर्चा रंगयाच्या आणि एकदा तर आठवतंय आमची रात्री १० च्या सुमारास ज्या गप्पा सुरु झाल्या त्या रात्री थेट २-२:३० पर्यंत चालल्या असतील. केतनबाबत सांगायचं तर मी त्याला पहिल्यापासून म्हणतोय, त्याचा प्रांत राजकारणंच आहे. कोणाशी कशा पद्धतीने डील करावं, कसे "games" खेळावेत ह्याच्याकडून शिकावं! खोटेपणा (गोड नाव डिप्लोमसी) चा मला मनस्वी राग असला तरी ह्या अवलियाची डिप्लोमसी मला कौतुकास्पद वाटते. कुठेतरी खरेपणाचा स्पर्ष असेल म्हणून म्हणा, किंवा "शठे च शाठ्यम" ह्या न्यायाने माझ्याशी सरळपणाने वागत असेल म्हनून म्हणा... पण काहीही असो... "ऐक रे" केत्या... तू राजकारणातंच जा!!!

इंग्रजीवरून मी मराठीवर कधी आलो कळलंच नाही (फार उत्कटतेने लिहितोय म्हणूनही असेल)। असो, पुढचा नंबर त्रुजुता! लोकांचे किती गैरसमज असतात. ऐकिवात असुनही आणि हिच्याशी ओळख होण्या आधीदेखील मला त्रुजुता कधीच गर्विष्ठ वाटली नही। Infact, मी तर म्हणीन की "मित्र-मैत्रिणींसोबत" हिचं वागणं, बोलणं कोणी पहावं आणि मग बोलून तर दाखवावं असं काही तिच्याबद्दल! Honestly, first year पासून आम्ही दोघं एकाच वर्गात आहोत आणि माझ्या observation नुसार तिचं असं आहे की ती सगाल्यान्शी मैत्री करेलाच असं नाही, पण ज्यांच्याशी करेल she does care a lot !!! (hmmm... किर्तीसारखं!) तिच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारचा smartness दोकवातो. (दुर्दैवाने लोकांकडे तो नसल्याने :D, आणि तिच्या selective nature मुळे हे तिच्यावर हेत्वरोप होत असावेत). तिच्याइतकी सहनशील, strong मुलगी आमच्या सम्पूर्ण batchमध्ये क्वचितंच कोणी असेल. मित्रमंडळींनी चिडवलंय आणि ती रागाने धुमसते आहे/seriously चिडली आहे, अशाताला एकही प्रसंग माझ्या तरी स्मरणात नाही.

सायली-मिनाक्षी, मिनाक्षी-सायली! एकीचं नाव घेतलं की दूसरी आठवायलाच हवी. इतक्या सोबत सोबत फिरत असतात की त्यांची third year पर्यंत माझ्यासाठी separate अशी identity नव्हतीच. दोघी महा sincere, शाळेत असल्यासारखं lecture सुरु व्हायला उशीर होत असेल तर सरांना जाऊन बोलावणार्या महामाया (सायली, एक हात वर!) ह्याच! खुप राग यायचा आम्हा मुलांना तुमचा. त्यावरनं 2nd year ला आपलं भांडणही झालं होतं! आता ही third टाइम, जाहीर माफी! पण परवा आपल्या अशाच गप्पा रंगल्या आणि फार छान वाटलं तुम्हाला नॉन-सीरियस मूड मध्ये पाहून. चिडवत होतो तेव्हाही तुम्हाला (काय करणार, जित्याची खोद...), पण वाटत होतं परत कधी आपण असे भेटू?

मिनाक्षिबद्दल एक विशेष बाब नमूद कराविशी वाटते, हिची परोपकारी प्रवृत्ती. इतरांचा इतका विचार करते, त्यामुळेच असेल कदाचित, ही भोळी असूनही हिला छोट्याशाही कारणाने फसवायाचा विचार कोणाच्या मनात आला तरच आश्चर्य! म्हणतात ना, do good and the good will come to you!
(*एक हात वर: सायली ला मी गंमत कधी करतोय आणि seriously कधी चिडलोय, हे कळावं म्हणून मी आणि आमचा तो कम्पू हल्ली एक हात वर करतो)

मकरंद (mak), नीरज आणि सौरभबद्दल एकत्रच लिहितो. तिघेही अभ्यासात आमच्या वर्गातली सगळ्यात Don पोरं! तिघांची Don गिरी मात्र वेगवेगळ्या प्रकारची! Mak मेहनती, टापटीप लिहिणार, वही जणू textbook असावं, पण तसा पाठांतरावर सर्व भिस्त असलेला असादेखील "नाही"! सौरभला कुठल्याही विषयाचं विचारा , उत्तर येतंच! उदा. संदेश, चेतन (आणि काहीसा मीदेखिल) programming, control system अशा mathematical विषयांमध्ये comfortable असतो, तर mak, केतन सारखे machines मध्ये interested आहेत. पण ह्या पठ्ठ्याला सगळं येतं. म्हणून तर ss: सर्वज्ञ सौरभ! (that reminds me other such similar names, पण ज्यांची त्यांना माहीत आहेत, तेव्हा ती इथे नमूद न करणं योग्य! :p) नीरजसाहेबांचं अभ्यासामागे conceptual understanding असतं, आणि this is what I appreciate the most! तिघेही भारी स्कोर काढतात, पण सुदैवाने तिघांचेही पाय जमिनीवर आहेत. (पाय जमिनीवर म्हटल्यावर सानिका, हिमांशु आणि शमिक डोळ्यासमोर आले, आणि ते अगदीच अपरिहार्यच होतं!)

अरे, room पार्टनर गौडिल्य रहिलाच की! हा संजीव गौड़! आमची कित्येक भांडणं झाली. कित्येक त्यातली सीरियस वळणावर देखील गेली, पण तितक्या लवकर ती मिटलीदेखील प्रत्येक वेळी. गौडील जे काही करतो, एकदम passionately! सम्पूर्ण वर्गाचं जर्नल टाइप करण्याच्या co-ordination चं काम स्वतःच्या डोक्यावर घेणार, sweat-shirt चं देखील तसंच! आणि करून सावरून groupism मध्ये संद्वित्च होणार तोही हाच! पण जबाबदारी झाटकणार म्हणून नाही! पुढच्या वर्षी पण जर्नल टाइप करवून घ्यायला आणि distribute करवून द्यायला हाच उभा! sad जोक्स मारेल, अवेळी पकवेल पण काही असो त्याच्यावर फार काळ रागावून राहता येत नाही. प्रत्येक ग्रुप डिनर ला, ट्रिपला तो नही तर ग्रुपला जान नही!

आता आठवतायत नच्या आणि टाली (चेतन सूर्यवंशी). ह्यांची E103 खरं तर जिन्याजवळ नाही आणि माझ्या जाण्यायेण्याच्या वाटेतली नाही, पण तरी कॉलेजमध्ये/जेवायला मेस मध्ये जाताना/येताना वाट वाकडी करून एकदातरी चक्कर ठरलेली. लोकांचं कधीकधी एकमेकांशी का पटावं आणि का तुटावं ते सांगता येत नाही. ह्यांच्या बाबतीत काहीसं तसंच आहे. E103 मध्ये माझी डेली चक्कर कशी आणि का होते, पावलं आपसूक तिथे का वळतात हे न उमगलेलं कोड़ं आहे. ते प्रेमाने आरोप करतीलही, की मी केतनलाच भेटायला येतो, पण हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत हे तेदेखील बहुधा जाणत असावेत.

शेवट करतांना overall चारी वर्ष आठवतायत! First year ला सानिका, हिमांशु, सागर, इर्शाच्या ग्रुपबरोबर केलेली धमाल, खडकवासला, आकुर्डी,संभाजी पार्क कुठे कुठे फिरलो होतो, एकत्र celebrate केलेले वाढदिवस, टाइमपास छोटी मोठी भांडणं, मिळून ती सोडवणं, हॉस्टेल मधले bumps, आम्ही घेतलेले तथाकथित ragging sessions (आमचं तर तेवढंही झालं नाही), 2nd year ला चढलेलं डोक्यावरचं robotics चं भूत, रात्र रात्र जागत बनवलेले ते manual robots, VSA freshers ला आम्हा मुंबईकरांना दिलेला निमंत्रण, मारामारीपर्यंत उतरलेल्या भांडणात मित्रांचा (esp. VSA उर्फ़ विदर्भच्या मित्रांचा) मिळालेलं पाठबळ, मुंबईकरांची औरंगाबाद ट्रीप, गौडाने वीरू-दा-ढाबामधे दिलेली पार्टी, exam च्याच दिवसांत जाणारे lights, चांदण्यात ग्रुपमध्ये शांतता ऐकत, कधी दंगा करत घालवलेले दिवस, एक ना दोन -हजार गोष्टी आहेत. काय आणि किती जणांबद्दल लिहू? प्रत्येक जन कुठेतरी स्वतःचा ठसा उमटवून गेला. ऐ मित्रा/सखे, तुझं नाव नसेलही इथे. माझ्या मर्यादा लक्षात घे आणि जे काही चुकलं-सवरलं असेल तर ते विसरून जा!

With best wishes!!! May all your wishes come true!!!

-वेधस पंडित
(8May,2008, at about 11:30 pm)

7 comments:

Minakshi said...

Hey Vedhas ..... very nice post...
While reading it .... it seems I am talking to you.....
eventhough it was in Marathi.... I enjoyed reading it and never felt bored even once.....
Realy your observation is excellent and art of framing it is even more appreciable
thanks a lot for dedicating such a nice blog to us....
keep writing....
and keep in touch....

<--sahdeV-- said...

I'm overwhelmed... :) Thanks!!!

sanjeevgaud said...

sahi vedhas..
U r too good at ur writing skills...
tuzya ha blog vachtana mi evda magann zalo ki mala kalach nahi ki tu chat karat aahe..
manhun reply dila nahi..
he bachun mala asa feel zala ki mi mazya magchya 4 year cha revision karat aahe..
Yaar really going to miss these ( you too ) days...
bas itna hi kehna hi ki hame bhoolna mat..
Enjoy life

Neeraj Karnik said...

Do you remember our Tunga trek? Our first trek together. We were discussing what were the most desirable traits each one of us possesed.(Mak-Sincerity, HOD-Genius brain etc.)
When it came to you, all of us got thinking. We laughed the thing off saying that you had no speciality.
As I read your blog now, I realize your best trait is not latent.
What strikes me the most is your honesty and your outspoken nature.
This is definitely an admirable trait. (I would not say desirable because 'Honesty' is not meant for'Cunning Karnik' you see)
Hey the last part was said in jest!
Always be your candid self!

MAKARAND said...

dhund hote shabd saare
dhund hotya bhavanaa...

wahava wahava ... ashihi suruvat karata aali asati but after readind your blog what popped up from the memory stack is this song...
the article posted on your blog is really good.. this might be the first comment from me on your blogpost. (this is not the first coz the article has taken cognizannce of mine.!!:) let it be .. english sudharun ghe re baba!!)

Vedhas.. Sahdev mirror image of your name sounds good(shabdshah:)
but the original name Vedhas suits to creativity expressed in the articles on your blog...

anakhi kaay lihu??
evadhach sangto ki aata comments takat jaain...

Ajay said...

Hey Vedhusssss............
Ekdum bhari lihile ahes..Full Emotional zala hotas vatate tya divshi...
Actually we both have discussed these things many a times but reading
this blog I feel like I am talking with u again....
And thanks for complement!!!!!
Ani ho mazya baddal asech chan chan lihit ja :)
Anyways keep writing....

<--sahdeV-- said...

@Sanju
Thanks...
aur bhulunga nahi!

@Neeraj
Hmmm, thnx for the appreciation... Now I know the reason for which u were eager to give me ur slambook.:) Thanks for pointing out the other side too! To undesirable trait asalyaanech control karu laglo ahe swat:la. Madhyantari mala maajhi 6vitli "rojnishi" (diary) sapadli, baraach shahana zalo ahe tari tulanene! :D

@Mak
"this is not the first coz the article has taken cognizannce of mine"???? kalala nahi!

Ani thnx tulaahi!

@Ajay

Ho yaar, "bekaar" senti zalo hoto. Mhanalaas te kharay, pan tuzyashi pratyaksha bolana hoil ki naahi konaas thaauk! Tuzyabaddal koni mahamurkha manusach (jo khara tar mi ahe, pan tari) kinva hita-shatruch (jo konich nasava) vaait lihu shakel!