प्रेमात पडणं म्हणजे..... हुरहुर ही आलीच
हुरहुर आहे म्हणजे उत्सुकताही..
उत्सुकता...
म्हणजे नक्कीच असतात काही अपेक्षा,,,
अपेक्षा आहेत तर ... अपेक्षाभंग हा तर ठरलेलाच!
म्हणजे आता परत एक वेडा स्वतःत गुरफटणार...
खरंच...!
तो वेडाच!!!!
स्वतःलाच स्वतःची कोडी घालतो तो!
सुटता सुटत नाहीत, पण तरी सोडवत बसतो....
का निव्वळ नाटक करतो?
तोच जाणे....!
मग थोड्यावेळाने स्वतःशीच हसतो!
म्हणतो "हे काय खरडलं मी? कोणाला पाहून वाटेल की मी खरंच प्रेमात पडलोय..."
परत हसतो तो!
हसतो खरा... पण ह्या वेळी काहीसा वेगळा! आत्ममग्न!
दारापाशी चाहुल लागते तसा तो भानावर येतो आणि त्याच्या नकळतंच वहीची पानं पलटवतो!
"काही लीहीत होतास?"
"छे रे! काही काय!! syllabus चाळत होतो इतकंच!"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.....आणि ही सुद्धा link तुटते ती कायमचीच!!! (हो, "सुद्धा"!)
ते पान आता त्याच्यासाठी अनोळखी असतं...
ना त्याला आता स्वतःचं ते कोडं आठवंत,
ना स्वतःच्याच ओळींचा अर्थ लागत....
ते पान तिथे बिचारं अर्थाशिवाय पोरकं झालंय...
नुसतं शब्दबंबाळ! बाकी काही नाही !
पण त्या पानाची ना काही तक्रार, ना त्याला कसला राग!
निमुटपणे वहीत दडी मारतं ते! पोटात कोणालाच न कळलेली गुपितं दडवून...!
4 comments:
तुझी blog वरची कविता वाचली.
मला कोणी केली माहिती होतं म्हणून
बायकोला, कोणाची तॆ न सांगता, वाचून दाखवली
तिला आवडली
तू लिहिली कळल्यावर म्हणाली
तो वेडा आहे
......का?
कविता चांगली करतो म्हणून
प्रेमभंग?
No premabhanga! :)
Ratri (2-3 nantar) suchata asa kahitari lihaayala..... kinva kadhi gaani aikaayla... maja yete....
sorry, khup ushira wachli hi kavita. Pan khup bhavli. Tula watel mi asa achanak kautuk mode madhe kasa kaay gelo!! Pan kharach, mala avadli hi kavita.
Post a Comment